शनिवारी रात्री मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; CSMT ते भायखळा, वडाळा रोड सेवा बंद; मुख्य मार्गावरील लोकल, एक्स्प्रेसवरही परिणाम

कर्नाक बंदर उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्च करण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी २० जुलै रोजी रात्री विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कर्नाक बंदर उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्च करण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी २० जुलै रोजी रात्री विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड स्थानकादरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. त्याचप्रमाणे मुख्य मार्गावरील लोकल, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांवरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यानच्या कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकादरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

शेवटच्या लोकल

-ब्लॉकआधी रात्री १२.१४ वाजता सीएसएमटी ते कसारा शेवटची लोकल असेल.

-ब्लॉकआधी रात्री १०.३४ वाजता कल्याण ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

-ब्लॉकनंतर पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी ते कर्जत पहिली लोकल असेल.

-ब्लॉकनंतर पहाटे ४ वाजता ठाणे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.

हार्बर मार्गावर

-ब्लॉकआधी रात्री १२.१३ वाजता सीएसएमटी ते पनवेल शेवटची लोकल असेल.

-ब्लॉकआधी रात्री १०.४६ वाजता पनवेल ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

-ब्लॉकनंतर पहाटे ४.५२ वाजता सीएसएमटी ते पनवेल पहिली लोकल असेल.

-ब्लॉकनंतर पहाटे ४.१७ वाजता वांद्रे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.

दादरपर्यंत चालवण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस

हावडा ते सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, भुवनेश्वर ते सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल

logo
marathi.freepressjournal.in