
मुंबई : गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. आकर्षक उंच गणेश मुर्तीची एक झलक डोळ्यात सामावून घेण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर भक्तांची गर्दी होत असते. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने ही १० लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार पहाटेपर्यंत लोकल भक्तांच्या सेवेत धावणार असून, प्रत्येक स्टेशनवर हॉल्ट असेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेने गणपती विसर्जन (अनंत चतुर्थी) निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कल्याण - ठाणे - बेलापूर स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपनगरीय विशेष ट्रेन सर्व स्थानकांवर थांबेल.
मेन लाइन - डाऊन /अप विशेष
-सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून १.४० वाजता सुटून कल्याणला ३.१० वाजता पोहोचेल.
-सीएसएमटी-ठाणे स्पेशल सीएसएमटीहून २.३० वाजता सुटेल आणि ३.३०वाजता ठाण्याला पोहोचेल.
-सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून ३.२५ वाजता सुटेल आणि ४.५५4 वाजता कल्याणला पोहोचेल.
-कल्याण-सीएसएमटी स्पेशल कल्याणहून १२.०५ वाजता सुटेल आणि १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
-ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून १ वाजता निघेल आणि सीएसएमटीला २ वाजता पोहोचेल.
- ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून २ वाजता निघेल आणि सीएसएमटीला ३ वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन - डाऊन / अप विशेष:
-सीएसएमटी-बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून १.३० वाजता सुटेल आणि बेलापूरला २.३५ वाजता पोहोचेल.
-सीएसएमटी- बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून २.४५ वाजता सुटेल आणि बेलापूरला ३.५० वाजता पोहोचेल.
-बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून १.१५ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला २.२० वाजता पोहोचेल.
-बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून २ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला ३.०५ वाजता पोहोचेल.