मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी बुधवार ते शुक्रवारपर्यत रात्रकालीन विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या कामासाठी लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि वंदे भारत ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर शनिवार १ जून २०२४ पर्यंत दररोज रात्री विशेष ब्लॉक असणार आहे.
शिवाजी महाराज टर्मिनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान अप धीम्या, अप-डाऊन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १०-१८ दरम्यान सर्व मार्गिका रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत उपनगरीय मार्गावर सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२ वाजून १४ मिनिटांनी सुटणार आहे. तर कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल शेवटची लोकल असेल.
लोकल सेवेला फटका
सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल असणार आहे.
कल्याणहून रात्री १०.३४
सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल असणार आहे.
सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल असणार आहे.
ठाण्याहून पहाटे ४ सीएसएमटी ही पहिली लोकल असणार आहे.
ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.
२८ ते ३१ मे या कालावधीत मेल-एक्स्प्रेस रद्द
१२१२५/१२१२६ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस
१२१२८ पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (३१ मे)
१७६१८ नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस ( ३१ मे)
२२२२४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (३१ मे)
दादर स्थानकात अंशत: रद्द केलेल्या मेल-एक्स्प्रेस
१२५३३ लखनऊ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस
११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस
११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस
१२८१० हावडा-सीएसएमटी
१२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस
२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस १२१३४ मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस
१११४० होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस
२२२२४ शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
१२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
पनवेल, ठाणेपर्यंतच एक्स्प्रेस धावणार
१२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणेपर्यंत चालविण्यात येणार आहे. १०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येणार आहे.
दादरहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
२२१५७ सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट
११०५७ सीएसएमटी-
अमृतसर एक्स्प्रेस
२२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस
२२१७७ सीएसएमटी-
वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
१२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस