मुंबई : पश्चिम रेल्वेने वेलंकन्नी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी वांद्रे टर्मिनस ते वेलंकणीदरम्यान एक विशेष गाडी चालवणार आहे. गाडी क्रमांक ०९०४३ व ०९०४४ वांद्रे टर्मिनस-वेलंकन्नी विशेष दोन फेऱ्या धावतील. ही गाडी वांद्रे टर्मिनस येथून गुरुवार ७ सप्टेंबर रोजी ९.२० वाजता सुटेल आणि शनिवारी १०.०५ वाजता वेलंकणी येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०४४ वेलंकन्नी - वांद्रे टर्मिनस विशेष शनिवार, ९ सप्टेंबर रोजी वेलंकन्नी येथून ९.४५ वाजता सुटेल आणि सोमवारी १२. ३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, लोणावळा, पुणे, सोलापूर येथे थांबून वेलंकणीला पोहोचेल. या विशेष गाडीचे बुकिंग १९ ऑगस्टपासून सुरू होईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.