गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

मुंबई-सावंतवाडी दैनिक विशेष गाडीच्या ४४ सेवा होणार आहेत.
 गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने ७४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई-सावंतवाडी दैनिक विशेष गाडीच्या ४४ सेवा होणार आहेत. गाडी क्रमांक ०११३७ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २.०० वाजता पोहचणार आहे. तर गाडी क्रमांक ०११३८ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ३.४५ वाजता पोहोचेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in