
मुंबई : माजी बँकर बनून ख्यातनाम गायक, अमेय डबली यांनी बॉलीवूडच्या पहिल्या संगीतमय लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. यात सैनिकांच्या जीवनातील विलक्षण कथांवर आधारित ‘वर्दी के वीर’ यावर संगीत कार्यक्रम करण्यात आला. यात संगीत प्रेमींना व्हिज्युअल्स आणि ध्वनींच्या आकर्षक संमिश्रणात हे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला एवीएसएम, एसएम, जीओसी, महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्रचे लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों, वायु सेना मेडल (वीएम) एयर वाइस मार्शल रजत मोहन, मुख्यालय समुद्री वायू संचालन,भारतीय नौसेना रियर ॲॅडमिरल आर. विनोद कुमार हे संरक्षण दलातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.