प्लास्टिकविरोधातील पालिकेच्या कारवाईला वेग; ६०० किलो प्लास्टिक जप्त

२६ जुलै, २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता
प्लास्टिकविरोधातील पालिकेच्या कारवाईला वेग; ६०० किलो प्लास्टिक जप्त

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री व खरेदी व उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध पालिकेच्या कारवाईला वेग आला आहे. १ ते २५ जुलैपर्यंत तब्बल १६ हजारांहून अधिक ठिकाणी छापा टाकत ५९० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तर या कारवाईतून तब्बल सात कोटी २५ लाखांचा दंड वसूल केल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

२६ जुलै, २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर, विक्री, खरेदी व उत्पादनावर बंदी घातली आहे; मात्र कोरोनामुळे २०२० पासून कारवाई थंडावली होती.

परंतु कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आल्याने १ जुलैपासून पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्या विक्री, खरेदी व उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची अंमलबजावणी सुरू केल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in