मुंबईत मालमत्ता विक्रीसाठी उत्स्फूर्त सहभाग;जुलैमध्ये ११,३३९ मालमत्तांची विक्री

नाइट फ्रँक इंडिया’च्या अहवालानुसार, जून महिन्यात ९९१९ घरांची विक्री करण्यात आली होती.
मुंबईत मालमत्ता विक्रीसाठी उत्स्फूर्त सहभाग;जुलैमध्ये ११,३३९ मालमत्तांची विक्री

कोरोनाचे मळभ दूर सरल्यानंतर आता मुंबईत मालमत्ता विक्रीसाठी लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गेल्या महिन्यात मुंबईत ११ हजार ३३९ मालमत्तांची विक्री झाली असून, त्यात १५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गेल्या दशकभरातील जुलै महिन्यातील ही सर्वाधिक विक्री ठरली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ८२९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

‘नाइट फ्रँक इंडिया’च्या अहवालानुसार, जून महिन्यात ९९१९ घरांची विक्री करण्यात आली होती. आता जुलै महिन्यात त्यात १५ टक्क्यांची वाढ झाली असून, त्यापैकी ८६ टक्के मालमत्ता या निवासी गटातील असून, १० टक्के व्यावसायिक मालमत्तांना खरेदीदारांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे, एकूण नोंदणीपैकी ७८ टक्के खरेदीदारांनी मालमत्ता विक्रीचे व्यवहार पूर्णदेखील केले आहेत.

ग्राहकांनी घरांचे मालकी हक्क मिळवण्यासाठी तसेच विक्रीसाठी चांगला प्रतिसाद दिल्याने रिआल्टी सेक्टरमध्ये तेजीचे वातावरण आहे. ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, अशा नामांकित विकासकांनी रिअल इस्टेटमध्ये आपला दबदबा निर्माण केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यामुळे राज्य सरकारला ८२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जुलै २०२१मध्ये हाच आकडा ५६७ कोटी रुपये इतका होता.

कोट्यवधींच्या मालमत्तांमध्येही वाढ

निवासी इमारतींमध्ये १ ते २.५ कोटी दरम्यान किमती असलेली घरे विकत घेण्यासाठीही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जूनमध्ये या विभागात ३७ टक्क्यांची नोंद झाली होती, तर जुलै महिन्यात ती ४२ टक्क्यांवर गेली आहे; मात्र ५०० आणि १००० स्क्वेअर फूट घरांनाच ग्राहकांची चांगली पसंती मिळत असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in