
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागातील आरोग्य विभाग व लोकसेवा समर्पण समाजिक ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्री उत्सव २०२३ साजरा करण्यात आला. नव युगात महिला सर्वच ठिकाणी अग्रगन्य् व प्रगती पथावर आहेत. प्रभादेवी म्यूनीसीपल स्कूल येथे नवरात्री उत्सव सोहळा निमित्त जी दक्षिण आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते यांच्या वतीने व लोकसेवा समर्पण समाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात मुलीचे महत्व वाढण्यासाठी बेटी बचाव या विषयावर आधारित नाट्य सादर करण्यात आले. जी/ दक्षिण विभागामार्फत लोकसेवा समर्पण सामाजिक ट्रस्टला उत्कृष्ठ संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. शीला जगताप, डॉ. उपालिमित्रा वाघमारे यांसह मान्यवर उपस्थित होते.