स्पोर्ट्स क्लब, जिमखान्यांना दिलासा मिळणार? भाडेपट्टा धोरण आणा; माजी नगरसेवकाची मागणी

रेसकोर्सच्या धर्तीवर अन्य स्पोर्ट्स क्लब, जिमखान्यांना भाडेपट्ट्यात सवलतीसाठी धोरण आणा, अशी मागणी पालिका भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
स्पोर्ट्स क्लब, जिमखान्यांना दिलासा मिळणार?  भाडेपट्टा धोरण आणा; माजी नगरसेवकाची मागणी
Salman Ansari/ FPJ
Published on

मुंबई : महायुतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला (आरडब्ल्यूआयटीसी) भाडेतत्त्वावर दोन कोटी रुपयांची सवलत दिली आहे. रेसकोर्सच्या धर्तीवर अन्य स्पोर्ट्स क्लब, जिमखान्यांना भाडेपट्ट्यात सवलतीसाठी धोरण आणा, अशी मागणी पालिका भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

२६ जून २०२४ रोजी राज्य सरकारने आरडब्ल्यूआयटीसीच्या भाडेपट्ट्यात सवलत देत ३ कोटींचे भाडे १ कोटींवर आणले आहे. त्यामुळे वर्षाला दोन रेसकोर्स क्लबची दोन कोटींची बचत होणार आहे. रेसकोर्सला भाडेपट्ट्यात सवलत दिली, त्याच धर्तीवर धोरण आणत मुंबईतील अन्य स्पोर्ट्स क्लब जिमखान्यांना सवलत द्या, अशी मागणी पत्राद्वारे केल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांसाठी एक आदर्श धोरण तयार केले पाहिजे. जेणेकरून कोणत्याही स्पोर्ट्स क्लब किंवा जिमखान्यावर अन्याय होणार नाही. आरडब्ल्यूआयटीसीच्या धोरणात अलीकडील बदल लक्षात घेता, इतर क्लब आणि जिमखान्यामध्ये अशी धारणा वाढत आहे की बांधकाम नसलेल्या क्षेत्रांसह संपूर्ण भूखंडांवर भाडे आकारणी असल्याने त्यांना अन्याय होतो. त्यामुळे एक आदर्श भाडे आकारणी धोरणा तयार करत कोणताही पक्षपात न करता समानता सुनिश्चित करेल आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करेल, असे नार्वेकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in