
७ महिने सुरु असलेला राज्यातील एसटी संप काही दिवसांपूर्वी पूर्वी मागे घेण्यात आला आहे. यानंतर राज्यात ठिकठिकाणी एसटी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र या एसटी बसेस रस्त्यावर धावत असताना चक्क नियम धुडकावून लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये उड्डाणपुलाजवळील किंवा त्याखालील बस थांबे टाळून थेट उड्डाणपुलावरून एसटी नेण्याचे प्रकार मुंबई महानगरात दिवसाआड घडत आहेत. यामुळे स्थानकात उभ्या प्रवाशांची गैरसोय होत असून याबाबत महामंडळाकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत. दरम्यान, तक्रारी प्राप्त झालेल्या मार्गांवर विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला असून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
संपानंतर सुरु झालेल्या एसटी बसेस महामंडळाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. महामंडळाचे आदेश धुडकावून मुंबईत नेहरू नगर, मुंबई सेंट्रल, परळ आगार, नॅन्सी कॉलनी, ठाण्यातील वंदना, खोपट, ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील आगार, तसेच महानगरातील अन्य आगारांतून निघणाऱ्या बसेस उड्डाणपुलाजवळच किंवा त्याखाली असलेल्या नियोजित बस थांब्यांवर न थांबता उड्डाणपुलावरून थेट पुढे निघून जात असल्याचे निदर्शास आले आहे.
एसटी न थांबताच काही चालक, वाहक थेट उड्डाणपुलावरूनच बस घेऊन जात असल्याने थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी थांब्यांवर खोळंबलेले प्रवासी बस आगार किंवा बस स्थानकात, तसेच एसटीच्या हेल्पलाईनवर चौकशीसाठी संपर्क करतात. परंतु बस निघून बराच वेळ झाल्याचे किंवा नियोजित थांबा सोडून पुढे गेल्याचे त्यावेळी प्रवाशांना लक्षात येते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून अनेक वेळेस कुटुंबासह उभे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा