एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा संपाचे हत्यार प्रलंबित मागण्यांसाठी उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन

१३ सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला
एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा संपाचे हत्यार प्रलंबित मागण्यांसाठी उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन
Published on

मुंबई : महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करूनही आणखी चार टक्के वाढ मिळावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसले आहे. सोमवार, दि. ११ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर १३ सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

राज्य सरकारने नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनाही तितकाच महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. कामगारांच्या मूळ वेतनात वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणीही केली आहे.

या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ११ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १३ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने काढण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in