Aamod 2023 : सेंट झेवियर्सच्या मराठी वाड्मय मंडळातर्फे आयोजित 'आमोद' सोहळा संपन्न

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाड्मय मंडळ हे मुंबई विद्यापीठातील सर्वात जुने कार्यरत मंडळ आहे.
Aamod 2023 : सेंट झेवियर्सच्या मराठी वाड्मय मंडळातर्फे आयोजित 'आमोद' सोहळा संपन्न

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाड्मय मंडळ हे मुंबई विद्यापीठातील सर्वात जुने कार्यरत मंडळ आहे. हे मंडळ मराठी भाषेचा, संस्कृतीचा, प्राचीन इतिहास, त्याचबरोबर त्याचे महत्त्व, आजकालच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ कायमच कटिबद्ध असते. 'आमोद' हा मराठी वाड्मय मंडळाचा अत्यंत महत्त्वाचा व मोठा उत्सव आहे. 'आमोद' म्हणजे निव्वळ आनंद. हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो.

￲१० वर्षापासून मराठी वाड्मय मंडळामध्ये साजरा होणारा 'आमोद' हा आंतरमहाविद्यालयीन उत्सव विद्यार्थ्यांना अनेक संधी प्रदान करतो. आपली प्रतिभा दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना दिग्गज कलाकारांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून देतो. तसेच, विद्यार्थ्यांना आपापल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही देतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म.वा.मं. 'आमोद' सादर करत आहे. 'आमोद'ची यावर्षीची थीम आहे 'शतकाच्या क्षितिजावर'. मराठी वाड्मय मंडळाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या वर्षी म.वा.मं. तर्फे अनेक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.

'आमोद' यावर्षी १५,२१,२२ जानेवारी २०२३ रोजी पार पाडण्यात येणार आहे. नुकताच त्याच्या सेमी फायनल्स पार पडल्या. विद्यार्थी प्रचंड संख्येने व प्रचंड उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वत्र आनंदाचे वातावण होते. अगदी नावाला शोभेल असा हा सोहळा होता. संगीत, साहित्य, नृत्य, कला यासारख्या विविध क्षेत्रांमधील मान्यवर परीक्षक म्हणून मंडळाला लाभले होते. दुष्यंत देवरूखकर, रिया गुप्ता, अजय वाव्हळ, महेश पुजारी असे अनेक कलाकार परीक्षक म्हणून आले. म. वा. मं.चा वार्षिक अंक 'पखरण' याचेसुद्धा १५ तारखेला अनावरण करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in