मंकीपॉक्सबाबत राज्य सरकार सावधान, विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर विविध देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मंकीपॉक्सबाबत राज्य सरकार सावधान, विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना
Published on

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर विविध देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंकीपॉक्सचा विषाणू पाकिस्तानपर्यंत पोहचला आहे. कोरोनाचा अनुभव पाहता राज्य सरकारने या आजाराबाबत दक्षतेच्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.

विमानतळ, बंदरांवरून मंकीपॉक्स रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांना नियमित समन्वय ठेवण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच मंकी पॉक्स रुग्णांच्या विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण दोन ते चार आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या आजाराचा मृत्यू दर सर्वसाधारणपणे तीन ते सहा टक्के असल्याने राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

मंकीपॉक्स संदर्भात विमानतळे आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून खातरजमा करून संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी अशा सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्यात. मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in