महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध - शिंदे

महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध - शिंदे

मुंबई : महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांकडे एक त्यागाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते. अन्याया विरुद्ध लढण्याचे काम, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना महिला आघाडी करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या कला शिंदे, शितल म्हात्रे, आशा मामेडी, संध्या वाढावकर, सचिव मनीषा कायंदे, ज्योती मेहेर, शिल्पा देशमुख, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, गजानन पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये, महिला बचत गट, लेक लाडकी, लखपती योजना, बस प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, महिला बचत गटांना सक्षम भांडवल उभा करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत यामध्ये पंधरा हजारावरून तीस हजार रुपये रक्कम करण्यात आली आहे यांसह अनेक निर्णय राज्य सरकारने महिलांच्या हिताच्या दृष्टीने राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकतेच राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले आहे, यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक भरीव कार्य होणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजच्या शिवदुर्गा महिला मेळाव्याचा संकल्प असा आहे की, “दिल्ली मुंबईत आमचं तोरण हेच आमचे महिला धोरण” यानुसार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परत एकदा मुख्यमंत्री आपल्याला करायचे आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक महिलेत शिवदुर्गा संचारावी अशा प्रकारची ही संकल्पना घेतलेली असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in