मुंबईत अत्याधुनिक सोयीयुक्त शौचालय; 'वर्दळीच्या १८ ठिकाणी बांधणार', पालिका ७८ कोटी रुपये खर्च करणार

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वर्दळीच्या १८ ठिकाणी अत्याधुनिक सोयीयुक्त शौचालय उभारणीचा निर्णय पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.
मुंबईत अत्याधुनिक सोयीयुक्त शौचालय; 'वर्दळीच्या १८ ठिकाणी बांधणार', पालिका ७८ कोटी रुपये खर्च करणार

मुंबई : मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वर्दळीच्या १८ ठिकाणी अत्याधुनिक सोयीयुक्त शौचालय उभारणीचा निर्णय पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. यासाठी मुंबईतील वर्दळीचे १८ स्पाॅटची निवड करण्यात येणार असून, यासाठी तब्बल ७८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. भविष्यात लोकसंख्येत वाढ होणार असून, सोयीसुविधांच्या मागणीतही वाढ होणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शौचालयांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. हाजी अली, वरळी, सायन, मुलुंड, माहीम, वांदे अशा वर्दळीच्या ठिकाणांची निवड करत एकूण १८ वर्दळीच्या ठिकाणी अत्याधुनिक सोयीयुक्त शौचालय उभारण्यात येणार आहे. यासाठी ७८ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

झोपडपट्टीत नाममात्र दरात कपडे धुवा!

झोपडपट्टीतल्या नागरिकांसाठी १६ सुविधा शौचालये बांधण्यात येत आहेत. या १६ ठिकाणी नाममात्र आकार भरून कपडे धुण्याची स्वयंसेवा पद्धतीच्या यंत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सोयीवरील विद्युत खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा पॅनल्स सुद्धा बसविण्यात येत आहेत. यासाठी ५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in