तानसा जलवाहिनीजवळ स्टेशन सर्व्हे ;अतिक्रमण, मालकीच्या जमीनीचा शोध घेण्यासाठी पालिका करणार ४ कोटी रुपये खर्च

तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावातून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
तानसा जलवाहिनीजवळ स्टेशन सर्व्हे ;अतिक्रमण, मालकीच्या जमीनीचा शोध घेण्यासाठी पालिका करणार ४ कोटी रुपये खर्च

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांपैकी तानसा जल वाहिनी एक आहे. मुलुंड ते अंधेरी सहार रोडपर्यंत तानसा जल वाहिनीचा विस्तार झाला आहे. जल वाहिनी जवळ अतिक्रमण, पालिकेच्या मालकीच्या जमीनीचा शोध, सद्यस्थितीत जल वाहिनी जवळ बांधकाम, रस्ता जातो का या गोष्टींचा शोध घेण्यासाठी टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ३ कोटी ९१ लाख १६ हजार २३४ रुपये खर्च करणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावातून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. ही सगळी धरणे मुंबईपासून १४० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे या धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे. जलवाहिनीजवळ सायकल ट्रॅक बांधण्याचे काम सुरू असून या कामात याठिकाणची बेकायदा बांधकामे अडथळा ठरत आहेत. त्यामुळे याठिकाणी टोटल स्टेशन सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या टोटल स्टेशन सर्व्हे आणि त्यांचे ७-१२चे उतारे मिळवण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

 या गोष्टीचा शोध घेणार!

मुलुंड ते सहार, अंधेरीमध्ये संपूर्ण स्टेशन सर्व्हे करून ट्रंक मेन्स नेटवर्क, वर्तमान स्थिती, अतिक्रमणे याचा शोध घेण्यासाठी आरेखने सीटीएस प्लॅन, डीपी रिमार्कस्, डीमार्केशन प्लॅनवर सुपर इंपोझ करणे आणि संबंधित शासकीय विभागाकडून बीएमसीचे भू दस्तावेज जमा करणे आणि बीएमसीचे जमीन मालकीचे दस्तावेज निर्माण करणे या गोष्टीचा शोध घेण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in