उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक

मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर हे एक महत्त्वाचे शहर आहे
उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक

उल्हासनगर :- गेल्या चार दिवसांपासून सावध भुमिका घेणाऱ्या उल्हासनगर मधील शिवसैनिकांचा संयम अखेर सुटला असून आज दुपारी संतप्त शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर मधील कार्यालयावर दगडफेक केली आहे.

ठाण्याच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उल्हासनगरात शिवसेनेने गेल्या चार दिवसांपासून सावध भुमिका घेतली होती. ह्या बंडाला शिवसेनेच्या 40 आमदारांनी पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रातील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली आली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. अश्यातच उल्हासनगर शिवसेना उपशहरप्रमुख अरुण आशान यांनी काल संपुर्ण शहरांतील मुख्य चौकात आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे बैनर्स लावले होते. असे असतानाच शनिवारी दुपारी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर मधील कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक केली. या घटनेनंतर उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर हे एक महत्त्वाचे शहर आहे. डोंबिवलीनंतर उल्हासनगर शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय आहे. सिंधीबहुल असलेल्या उल्हासनगर शहरात खासदार शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळाले. तर अडीच वर्षांपूर्वी हातातून निसटलेली पालिकेतील सत्ताही खासदार शिंदे यांच्या माध्यमातून परत मिळाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात तेही त्यांचे पुत्र खासदार असलेल्या त्यांच्या मतदार संघातील उल्हासनगरमध्ये पहिला उघड विरोध झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या प्रकरणी घटनास्थळावरून चार ते पाच जणांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in