विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी वाटपात ठेंगा, मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या आमदाराचा निधी रोखला-अजय चौधरी

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विकास निधी भरभरुन दिला, तर विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी वाटपात ठेंगा दाखवला.
विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी वाटपात ठेंगा, मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या आमदाराचा निधी रोखला-अजय चौधरी

मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विकास निधी भरभरुन दिला, तर विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी वाटपात ठेंगा दाखवला. ठाकरेंच्या शिवसेनेला निधी वाटप करु नये, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी केला आहे. तर सत्ताधारी आमदारांना दिलेल्या निधीतून काहीच विकासकामे झाली नसून हा पैसा नेमका कुठे झिरपला, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेचा विकास निधीचे राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईच्या पालक मंत्र्यांनी वाटप करताना पक्षपात केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. मुंबईतील विविध पक्षाच्या ३६ आमदारांपैकी केवळ सत्ताधारी पक्षाच्या २१ आमदारांना या विकास निधीचे वितरण केला, मात्र विरोधी पक्षाच्या १५ आमदारांना निधीबाबत डावलले आहे.

मविआच्या मुंबईतील आमदारांची एकूण संख्या १५ आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी महापालिकेकडे एकूण १११.२६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. यातला एक रुपयाही महापालिका प्रशासनाने या आमदारांना दिलेला नाही, असा आरोप चौधरी यांनी केला.

आमदारांना दिलेला पैसा नेमका कुठे झिरपला? - वर्षा गायकवाड

लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा हा अवमान असल्याचा आरोप मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईच्या विकास कामांसाठी निधी वाटप करताना केवळ सत्ताधारी आमदारांना निधी दिला आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलले आहे. सत्ताधारी आमदारांना दिलेल्या निधीतूनही काहीच विकासकामे झाली नसून हा पैसा नेमका कुठे झिरपला, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in