मुंबई-सावंतवाडी गाडीला झाराप स्थानकावर थांबा; पश्चिम रेल्वेचा निर्णय

पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांना झाराप स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.
मुंबई-सावंतवाडी गाडीला झाराप स्थानकावर थांबा; पश्चिम रेल्वेचा निर्णय
Published on

मुंबई : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांना झाराप स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड-मुंबई सेंट्रल गणपती विशेष गाडीला झाराप स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

पश्चिम रेल्वेमार्फत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या पैकी २ सप्टेंबर रोजी ०९००९ क्रमाकांची मुंबई सेंट्रल-सांवतवाडी रोड स्पेशल गाडी सुटेल. ही गाडी झाराप स्थानकावर १.३० वाजता पोहचेल आणि १.३२ वाजता तेथून निघेल. ३ सप्टेंबर रोजी सांवतवाडी येथून निघणारी ०९०१० ही गाडी झाराप स्थानकावर ५ वाजता पोहचेल आणि ५.०२ वाजता स्थानकाहून निघेल.

कोकणावासीयांसाठी सोडलेल्या सर्व मेल/एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने आरक्षण बंद झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्याची, अशी मागणी रेल्वे संघटनांनी केली आहे.

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वेटिंग तिकीट असणाऱ्या प्रवाशांना मेल/एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी द्यावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in