
मुंबई : म्युच्युअल फंड सही है असा दावा करणारी जाहिरात रोखा. या जाहिरातीवर कारवाई करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सेबी तसेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
या जाहिरातीविरोधात चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रकांत शाह यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया संघटनेमार्फत केल्या जाणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही है’ यांसारख्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत, असा दावा याचिकेत केला आहे.