मुलुंडच्या बांधकाम व्यावसायिकाला ‘स्टॉप वर्क’ नोटीस ;प्रदूषणास कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक रडारवर

शहरातील नियमांचे उल्लंघन करीत असल्याने बांधकामांना नोटीसा पाठविण्यास पालिकेने सुरूवात केली आहे.
मुलुंडच्या बांधकाम व्यावसायिकाला ‘स्टॉप वर्क’ नोटीस ;प्रदूषणास कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक रडारवर

मुंबई : हवेतील गुणवत्ता खालावणे तसेच प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर बांधकाम व्यवसायिकांना आता पालिकेने ‘स्टॉप वर्क नोटीस’ बजावण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या नोटीशीनंतर बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून उपाययोजना करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

मुंबईच्या हवेतील गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सुधारण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे. मात्र बांधकाम ठिकाणी काळजी न घेतल्याने हवेचे प्रदूषण वाढत आहे. पालिकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक उपाययोजनांचा करणे बंधनकारक केले आहे. पालिकेने बांधकाम व्यावसायिकांना ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान ३५ फूट उंच पत्रे उभारले जातील याची खात्री करण्यास सांगितले. मात्र प्रदुषण रोखण्यासाठी या उपाययोजनांबाबत बांधकाम व्यवसायिक गंभीर नसल्याचे निदर्शनास आले.

शहरातील नियमांचे उल्लंघन करीत असल्याने बांधकामांना नोटीसा पाठविण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. बांधकामाच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुंलुंडमधील प्रेस्टिज ग्रुपला त्यांचे बांधकाम थांबवण्याची नोटीस पाठवली असल्याची माहिती पालिकेच्या मुलुंड येथील टी वॉर्ड कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली.

मुलुंड येथील प्रेस्टिज सिटी, सिएस्टा या इमारतीच्या बांधकामाच्या जागेची पाहणी सहाय्यक आयुक्त यांच्या पथकाने केली. या पाहणीनंतर काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती टी. वॉर्ड कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in