जुन्या वादातून मित्राची गळा आवळून हत्या

ही शोधमोहीम सुरू असताना काही तासांत प्रदीप मंडल आणि श्रीनंदन प्रमाणिक या दोघांना पोलिसांनी अटक केली.
जुन्या वादातून मित्राची गळा आवळून हत्या

मुंबई : जुन्या वादातून विनोद मंडल या तरुणाची हत्या करून पळून गेलेल्या दोन्ही मारेकऱ्यांना एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. प्रदीप धनंजय मंडल आणि सुरज श्रीनंदन प्रमाणिक अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही मूळचे झारखंडचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत विनोद मंडल हा झारखंडचा रहिवाशी असून, धनजी स्ट्रिट परिसरात हमालीचे काम करतो. दोन्ही आरोपी त्याचे मित्र असून, ते तिघेही एकत्र राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. याच वादातून शनिवारी या दोघांनी विनोदची गळा आवळून हत्या केली होती. ही माहिती मिळताच एल. टी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. विनोदला जी. टी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर त्याच्यासोबत राहणारे दोन्ही मित्र पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असताना काही तासांत प्रदीप मंडल आणि श्रीनंदन प्रमाणिक या दोघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून विनोदची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in