प्लास्टिकविरोधातील कारवाई कठोर; १५ ऑगस्टनंतरही धाडी टाकण्याचा पालिकेचा निर्णय

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून वेळोवेळी करण्यात येते.
प्लास्टिकविरोधातील कारवाई कठोर; १५ ऑगस्टनंतरही धाडी टाकण्याचा पालिकेचा निर्णय
Published on

कोरोनामुळे थंडबस्त्यात गेलेली प्लास्टिकविरोधातील कारवाईची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सण उत्सव असून या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर दुकाने, समारंभ आदी ठिकाणी धाडी टाकण्याचा अॅक्शन प्लॅन पालिकेने तयार केला आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून वेळोवेळी करण्यात येते. प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊन आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१८मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही कारवाई थंडावली होती. यादरम्यान प्लास्टिकच्या वापराचे प्रमाणही वाढले. मात्र पालिकेने १ जुलैपासून पालिकेच्या माध्यमातून पुन्हा सुरू आहे. यातच राज्य सरकारनेही मंगळवारीच पुन्हा एकदा बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादक, विक्रेते आणि वापरकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in