मुंबईतील सुवर्णनगरीवर महानगरपालिकेची कडक कारवाई; अनधिकृत धुरांड्या, चिमण्या, भट्ट्या केल्या बंद

या बाजारातील सोनं बनवणाऱ्या या कारखान्यांच्या धुरामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबईतील सुवर्णनगरीवर महानगरपालिकेची कडक कारवाई; अनधिकृत धुरांड्या, चिमण्या, भट्ट्या केल्या बंद
Published on

मुंबईत सध्या वायू प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होतं आहे. लोकांमध्ये सर्दी, खोकल्याचं प्रमाण आणखी वाढलं आहे. परीस्थितिचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील भुलेश्वर येथील झवेरी बाजारपेठेत कारवाई केली आहे. झवेरी बाजारामुळे मुंबईला सोन्याची नगरी असं म्हटलं जातं. देशभरातील सर्वात मोठे सोन्याचे आणि चांदीचे व्यवहार तिथं होतात. पण आताची परीस्थिति बघता हीच सोन्याची झळक आता मुंबईकरांच्या जीवावर बेतली आहे. कारण या बाजारातील सोनं बनवणाऱ्या या कारखान्यांच्या धुरामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

तब्बल तीन हजारांपेक्षाही अधिक सोन्याच्या दागिन्यांवर काम करणारे कारखाने 24 तास कायम सुरु असतात. त्यामुळे भूलेश्वर, काळबादेवी, मुंबा देवी, सीपी टँक परिसरासह पूर्ण गिरगाव परिसर या अनधिकृत कारखान्यांच्या धुरामुळे पूर्णतः त्रासून गेला आहे. या सोने-चांदी व्यावसायिकांच्या भट्टी आणि चिमण्यांमधून निघणारा धूर वायुप्रदूषणास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेन या धुरांड्या, चिमण्या, भट्टी निष्कासित केल्यात.

तसंच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनानं कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

या व्यावसायांशी संबंधित असणाऱ्या मजुरांचा गेल्या १३ वर्षात ३८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसंच 2005 मध्ये केईएम रुग्णालयाच्या सर्व्हेनुसार तेथील 55 टक्के नागरिकांना दमा आणि श्वसनाचे आजार आहेत. या विषारी वायूचे परिणाम मजुरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतं असल्याचं निदर्शनास आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in