कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार -  शेख

कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार  -  शेख

राज ठाकरेंचे आंदोलन म्हणजे एक्स्पायरी डेट संपलेल्या नेत्याने एक्स्पायरी डेट संपलेले मुद्दे घेऊन केलेले आंदोलन आहे, अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आहे. “स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राज ठाकरेंना गंगेत तरंगणारी हिंदूंची प्रेते का दिसली नाहीत. बेरोजगारीने बेजार झालेला, महागाईने होरपळून निघणारा हिंदू राज ठाकरेंना का दिसत नाही. राज ठाकरेंचे कार्यकर्ते जेव्हा उत्तर भारतीय व बिहारींची डोकी फोडत होते ते उत्तर भारतीय व बिहारी हिंदू नव्हते का?” असा सवालही त्यांनी विचारला.

Related Stories

No stories found.