आश्वासन दिल्यानंतर कंत्राटी चालकांचा कामबंद आंदोलन मागे

पगार वेळेत मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या रविवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते.
आश्वासन दिल्यानंतर कंत्राटी चालकांचा कामबंद आंदोलन मागे

वेतन वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी चालकांनी रविवारपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. चार दिवस कामबंद आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले; मात्र चौथ्या दिवशी कंत्राटी चालकांना कंत्राटदाराने आश्वासन दिल्यानंतर बुधवारी कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, काम बंद आंदोलनामुळे कंत्राटदाराला प्रति बस प्रतिदिन पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने दिली.

पगार वेळेत मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या रविवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. एम.पी. ग्रुपच्या खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांचे वडाळा आगारांतील चालकांनी कामबंद सुरू केले होते. त्यामुळे जवळपास ६३ बसगाड्या आगारातच उभ्या होत्या. सलग चार दिवसांपासून कामबंद असतानाही बेस्ट प्रशासनाकडून यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नव्हता.

कंत्राटदारावर कारवाईचा इशारा दिल्यानंतर बुधवारी कंत्राटदाराने कंत्राटी चालकांना आश्वासन दिल्यानंतर काम कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

या कंत्राटी पद्धतीवर असलेल्या बसेस वडाळा, दादर रेल्वेस्थानक, परळ, काळाचौकी येथून सोडल्या जातात. वडाळा, शिवडी, केईएम रुग्णालय आदी महत्त्वाच्या ठिकाणी या बसेस चालवल्या जातात; मात्र संपामुळे मागील चार दिवसांपासून या बसेस बंद असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in