माथाडी कामगारांचे आजपासून आमरण उपोषण

टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे या कंपनीकडील पिंपरी-चिंचवड बोर्डाच्या टोळी नं.४९५ मधील माथाडी कामगार आणि इतर माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांना न्याय मिळण्यासाठी
माथाडी कामगारांचे आजपासून आमरण उपोषण

मुंबई : टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे या कंपनीकडील पिंपरी-चिंचवड बोर्डाच्या टोळी नं.४९५ मधील माथाडी कामगार आणि इतर माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांना न्याय मिळण्यासाठी सोमवार, १२ फेब्रुवारीपासून आझाद मैदान, मुंबई याठिकाणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखालील कामगार-कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण आयोजित करण्यात आले आहे. मे. टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी या कंपनीकडील टोळी नं. ४९५ मधील माथाडी कामगारांच्या कामाची संपूर्ण मजूरी लेव्हीसह पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळात मालकामार्फत थेट मजुरी जमा व्हावी, मजूरीच्या रक्कमेचा होत असलेला अपहार थांबण्याकरीता कारवाई करावे, कंपनी व कॉन्ट्रक्टर मूळ मालक म्हणून मंडळात नोंदीत व्हावे, याबरोबर कोल्हापूर बोर्ड, ग्रोसरी, भाजीपाला व रेल्वे बोर्डातील कामगारांच्या विविध मागण्यां राज्य सरकारच्या कामगार विभागाकडे, माथाडी कामगार आयुक्त, माथाडी मंडळाकडे सादर केल्या आहेत, परंतु न्याय्य प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे आमरण उपोषण करण्याचा निर्णय कामगार-कार्यकर्त्यांनी घेतला आहे.. मे. टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे या कंपनीकडील पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळाच्या टोळी नं.४९५ मधील माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन करीत आहे.

या युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांबद्दल अनेक वेळा कामगार मंत्री, कामगार सचिव, कामगार आयुक्त यांचेकडे निवेदने सादर करुन प्रश्नांची सोडवणुक करण्याचा आग्रह केला, परंतु राज्याचे कामगार विभाग कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल त्यांनी खत व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in