देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्सची १२७७ अंकांची उसळी

मंगळवारी सेन्सेक्स १२७६.६६ अंकांनी किंवा २.२५ टक्के वाढून ५८,०६५.४७ वर बंद झाला.
देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्सची १२७७ अंकांची उसळी

मंगळवारी, नवमीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी सेन्सेक्स १२७७ अंकांनी आणि निफ्टी ३८७ अंकांनी उसळला. दरम्यान, जागतिक आणि देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीने भारतीय चलन बाजारात मंगळवारी रुपयालाही बळ मिळाले. रुपया २९ पैशांनी मजबूत होऊन ८१.५३ झाला. सोमवारी रुपया ४२ पैशांनी घसरून ८१.८२ झाला होता.

मंगळवारी सेन्सेक्स १२७६.६६ अंकांनी किंवा २.२५ टक्के वाढून ५८,०६५.४७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी ३८६.९५ अंकांनी किंवा २.२९ टक्के वाढीसह १७,२७४.३०वर बंद झाला. दसऱ्याच्या एक दिवस आधी बाजारात सर्वच क्षेत्रात सकारात्मक व्यवहार झाले. धातू क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. दिवसभरात तो १३११.१३ अंक किंवा २.३० टक्के उसळून ५८,०९९.३० ची कमाल पातळी गाठली होती.

सेन्सेक्समधील ३० पैकी २८ समभाग तेजीत आहेत. त्याच वेळी, केवळ २ समभागांमध्ये घसरण झाली. इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प, अदानी एंटरप्रायझेस, बजाज फायनान्स, आयशर मॉर्ट्स, कोल इंडिया, टीसीएस, एचडीएफसी, जेएसडब्ल्यू स्टील हे निफ्टी ५०मध्ये सर्वाधिक वाढले. दुसरीकडे, डॉ. रेड्डी आणि पॉवर ग्रिड हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एनएसईच्या सर्व ११ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खासगी बँक क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक २.७० टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, बँका, वित्तीय सेवा, आयटी, धातू आणि पीएसयू बँक क्षेत्रांमध्येही दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. फार्मा, ऑटो, एफएमसीजी, मीडिया आणि रिअल्टी क्षेत्रातही तेजी आहे. याआधी, आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात सुमारे ९०० अंकांची वाढ झाली. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ९२०.५३ अंकांनी वधारून ५७,७१५.९३ अंकांवर, तर निफ्टी २८५ अंकांनी वाढून १७,१७२ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होते. महानवमीच्या दिवशी जागतिक बाजारातूनही देशांतर्गत बाजाराला चांगले संकेत मिळाले. ही तेजी दिवसभर कायम राहिली. अमेरिकन बाजारांनी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात तेजीने केली. यादरम्यान, डाऊ जोन्स ७६५ अंकांनी वाढून २२,९४१वर तर नॅस्डॅक २४० अंकांनी वाढून १०,८१५ वर बंद झाला. एस ॲण्ड पी ५०० २.५ टक्के वाढले.

अमेरिकी बाजार मजबूत झाल्यानंतर आशियाई बाजारांमध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली. जपानच्या निक्कीमध्ये सुमारे ७०० अंकांची वाढ झाली. मंगळवारच्या बाजारात अदानी ग्रीनचे शेअर्स सहा टक्क्यांनी वधारले, तर हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या सत्रात पाच टक्क्यांनी वाढ झाली. मंदीच्या भीतीने जागतिक बाजारातील खराब संकेतांमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स ६३८अंकांनी घसरून ५६,७८८ वर बंद झाला. निफ्टी २०८ अंकांनी घसरून १६,८८५वर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.७८ टक्का वधारून प्रति बॅरलचा भाव ८९.५५ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी ५९०.५८ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in