चॉकलेट्स विक्रीद्वारे जगण्याची धडपड;साठी ओलांडलेल्या वृद्ध महिलेची व्यथा

प्रवाशांनी हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केला असून दोन दिवसात लाखो लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला आहे
चॉकलेट्स विक्रीद्वारे जगण्याची धडपड;साठी ओलांडलेल्या वृद्ध महिलेची व्यथा

मुंबईची लाइफलाइन म्हटले की , त्यासोबत या लोकलमध्ये लहानसहान वस्तूंची विक्री करून आपले पोट भरणारे असंख्य लोक दिसतात. प्रत्येक जण आपले जीवन वेगवगेळ्या संघर्षातून जगत असतो, याची प्रचिती पुन्हा आली आहे. आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी एक वृद्ध महिला लोकलमध्ये चॉकलेट्स विकत आहे.

प्रवाशांनी हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केला असून दोन दिवसात लाखो लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला आहे. उतरत्या वयात आरामाची आवश्यकता असताना थरथरत्या हाताने लोकलमध्ये वृद्ध महिला चॉकलेट विकताना पाहून अनेक प्रवासी भारावून गेले आहेत. इन्स्टाग्रामवर मोना खान या प्रवासी महिलेने हा व्हिडीओ शेअर केला असून ‘ती मागणी करत नाही, ती मेहनत करत आहे. जमेल तेवढी मदत करा,’ असे आवाहन त्यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

रेल्वे प्रवासात अनेक लहान मुले, महिला-पुरुष विविध वस्तूंची विक्री करताना दिसतात. कोणी महिलांसंबंधित विविध वस्तूंची विक्री करतात. तर कोणी फळे, भाजीपाला, वह्या-पेन अशा विविध वस्तूंची विक्री करत आपली दैनंदिन कमाई करतात. तर अनेकवेळेस काहीही न करता भीक मागताना काही लोक आढळतात. त्यावेळी त्यांना पाहून प्रत्येक प्रवासाच्या मनात भीक मागण्याऐवजी मेहनत करून चार पैसे कमावले पाहिजे, अशी भावना येते; मात्र अलीकडेच उपनगरीय रेल्वेमध्ये वयाची ६० वर्षे ओलांडलेली वृद्ध महिला चॉकलेटसची विक्री करून पोट भरण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in