कुंभार समाजातर्फे विद्यार्थी सत्कार समारंभ

हा सोहळा २९ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता माटुंगा येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.
कुंभार समाजातर्फे विद्यार्थी सत्कार समारंभ

मुंबई : कुंभार समाज, मुंबई या संस्थेतर्फे १०वीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त आणि १२वीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या तसेच पदविका, पदवी आणि अन्य क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. हा सोहळा २९ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता माटुंगा येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. सितेश विष्णू मळेवाडकर, डॉ. जय संदीप माणगांवकर आणि उद्योजक दत्तात्रय रसाळकर यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तरी विद्यार्थांनी आपली नावे गुणपत्रिकेसह २८ ऑक्टोबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in