
मुंबई : शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १४ तर्फे जनता केंद्र, ताडदेव येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. विभागप्रमुख दिलीप नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सही असलेले प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दहावीत ९९.४० टक्के मिळवून दक्षिण मुंबईतून प्रथम आलेली चैताली दीपक राणे हिला लॅपटॉप तसेच १२वीला ९१ टक्के मिळून प्रभागातून प्रथम आलेली मानसी अशोक सांगळे हिला टॅब भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात एकूण १९० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.