BMC शाळांमधील विद्यार्थी दंतविकार आणि त्वचारोगाने ग्रस्त

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षादरम्यानआरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान गेल्या वर्षभरात तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दंतविकार आणि त त्वचारोग झाल्याचे समोर आले आहे.
BMC शाळांमधील विद्यार्थी दंतविकार आणि त्वचारोगाने ग्रस्त
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षादरम्यानआरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान गेल्या वर्षभरात तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दंतविकार आणि त त्वचारोग झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी शैक्षणिक वर्षात तपासणी केली जाते, अशी माहिती पालिकेचे शिक्षण विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. धीरज पगार यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दहा शालेय चिकित्सालयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून माहिती देण्यात येते. आरोग्याची कशी काळजी घ्यावी, कशी निगा राखावी याबाबतची माहिती या निमित्ताने मुलांना दिली जाते, असेही पगार यांनी सांगितले.

वर्षभरात ३,७६,७१९ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तर जून २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान १ लाख २८ हजार ४२९ मुले आणि १ लाख २६ हजार ६९ मुली अशा एकूण दोन लाख ५४ हजार ४९८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. तर जून २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान ७४१७४ मुले आणि ७२ हजार ९१९ मुली मिळून एक लाख ७४ हजार १७३ मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एक लाख ४७ हजार १७१ विद्यार्थ्यांना उपचार देण्यात आले, असल्याची माहिती शिक्षण आरोग्य विभागाने दिली आहे.

सर्वाधिक १६ टक्के विद्यार्थ्यांना दंतविकार

- साडेपाच टक्के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष

- प्रत्येकी चार टक्के विद्यार्थ्यांना त्वचारोग आणि अशक्तपणा

- एक टक्का विद्यार्थी डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त

- अनेक विद्यार्थ्यांना हर्निया, अपेंडिक्स, हाडाच्या समस्या

- सात विद्यार्थ्यांवर हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया

- ११४ विद्यार्थ्यांवर विविध शस्त्रक्रिया

logo
marathi.freepressjournal.in