पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे धडे मिळणार

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणार आहेत.
 पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे धडे मिळणार

पालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन व कचऱ्याची विल्हेवाट कशी लावात आपला परिसर कसा स्वच्छ ठेवावा, याचे धडे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे धडे दिल्यानंतर ते पालक, आपल्या परिसरातील सोसायटी, चाळ आदी ठिकाणी चेंज मेसेंजर म्हणून काम करतील आणि परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास हाच विषय न ठेवता परिसरात काय सुरु काय गरजेचे याचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन काय आणि कसे होते या विषयी अवगत करण्यात येणार आहे. जवळपास वर्षभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे या विषयी अवगत करण्यात येणार आहे. मुंबई कचरा मुक्त किती महत्त्वाचे याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या परिसरात चेंज मेसेंजर म्हणून काम करतील आणि परिसरातील लोकांमध्ये जनजागृती करतील, असे कुंभार यांनी सांगितले.

पालिका शाळांतील सद्यस्थिती

विद्यार्थी संख्या : ३,९८,४९८ एकूण शिक्षक : १०,४२०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in