
बेस्टच्या कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बेस्ट भवनातील उपाहारगृहातून मोफत जेवण पुरविण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. उपाहारगृहातच मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत आता पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनाही सकस आहार देण्याची योजना असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
२ मे रोजी बेस्ट उपक्रमाने अक्षय योजना सुरू केली. या योजनेचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कुर्ला आगारात झाले. या योजनेच्या माध्यमातून बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि सकस आहार पुरविला जाणार आहे.