विद्यार्थ्यांचा बसला लटकून प्रवास

जीव धोक्यात घालून प्रवास टाळा -बेस्टचे आवाहन
विद्यार्थ्यांचा बसला लटकून प्रवास

मुंबई : मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसने काही मुले लटकून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बसने लटकून प्रवास करणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे लटकून प्रवास करू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना केले आहे.

बेस्ट बसने काही मुले लटकून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी अशी घटना घडू नये म्हणून बस निरीक्षकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बस पुरवठादार कंपन्यांना लवकरात लवकर बस पुरवठा करण्याचे सांगण्यात आले आहे, जेणेकरून प्रवाशांना अधिक बसेस उपलब्ध होतील, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in