नवरात्र, दुर्गापूजा मंडळांसाठी अनुदानित निवासी दर ; अधिकृत वीज जोडणी घेण्याचे मंडळांना आवाहन

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड हे अर्ज प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत नवरात्र मंडपांसाठी अनुदानित निवासी दर देऊ करत आहे.
नवरात्र, दुर्गापूजा मंडळांसाठी अनुदानित निवासी दर ; अधिकृत वीज जोडणी घेण्याचे मंडळांना आवाहन

मुंबई : दरवर्षी नवरात्रोत्सव मुंबई शहरात सामुहिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. अदाणी इलेक्ट्रिसिटी ही सण साजरा करण्यासाठी यंदा सज्ज आहे. या उत्सवा दरम्यान प्रामुख्याने मंदिरात किंवा मंडपामध्ये देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. शहरातील अग्रणी वीज कंपनी म्हणून या उत्सवादरम्यान मुंबईकरांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय अभिमान आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड हे अर्ज प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत नवरात्र मंडपांसाठी अनुदानित निवासी दर देऊ करत आहे. नवरारात्र तसेच दुर्गापूजा मंडळे वीज जोडणीसाठी आवश्यक अर्ज सादर करण्याहेतू अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या www.adanielectricity.com या संकतेस्थळाला किंवा अन्य साहाय्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या नजीकच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात.

नवरात्र/दुर्गापूजा मंडपांना तात्पुरती वीज जोडणी देण्याबाबत अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, "संपूर्ण मुंबई शहर हे यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सज्ज असताना अखंडित वीज पुरवठ्याची निकड आम्ही जाणून आहोत. गेल्या वर्षी आम्ही संपूर्ण मुंबईतील ५६८ हून अधिक नवरात्र मंडपांना अखंड वीज पुरवठा करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वीज जोडणी अत्यंत जलदपणे पुरविण्यासाठी आणि वीज पुरवठ्याची विश्वासार्हता राखण्यासाठी आमच्या परिचलन पथकाने यंदाही पूर्ण तयारी केली आहे. दुर्गापूजा मंडळांकडून अर्ज प्राप्त होण्याच्या ४८ तासात वीज पुरवठा सुरळीत होईल, याची आमचा चमू खात्री करत आहे.

कंपनी प्रवक्त्याने सांगितले की, “आमचा यासाठीचा समर्पित असा जलद प्रतिसाद चमू हा नवरात्र मंडप आणि दुर्गा भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी त्वरित प्रतिसाद आणि पुनर्पुरवठा योजनेसह या वर्षीही सज्ज आहे."

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने सर्व नवरात्र मंडळांना आवाहन केले आहे की, दुर्गापूजा मंडपाला भेट देणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी अधिकृत परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडूनच वीज जोडणीचे काम करून घ्यावे.

logo
marathi.freepressjournal.in