सबवे होणार चकाचक! आणखी सात पुलांची दुरुस्ती; सात कोटींचा खर्च

पादचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सबवेचा कायापालट होणार आहे. तर सीएसएमटी सबवेसह अन्य सात पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
सबवे होणार चकाचक! आणखी सात पुलांची दुरुस्ती; सात कोटींचा खर्च

मुंबई : पादचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सबवेचा कायापालट होणार आहे. तर सीएसएमटी सबवेसह अन्य सात पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तब्बल पावणेसात कोटी रुपये खर्च होणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले.

कुलाबा ते भायखळा या दक्षिण मुंबईतील पुलांचे सर्वेक्षण करून ए विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्ग, मेट्रो भुयारी मार्ग, वाय. एम. पूल, अर्देशिर इराणी अर्थात केनेडी पूल, सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पूल, ग्रँट रोड येथील रस्ता पूल, ग्रँट रोड येथील स्पेंटा पूल भायखळा एस पूल या सात पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी महापालिका तब्बल पावणे सात कोटी रुपयांचा खर्च करणार असून या कामांसाठी डी बी इन्फ्राटेक या कंपनीची निवड केली आहे.

विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मार्गाच्या नूतनीकरणासह अनेक पायऱ्या आणि भिंतींवरील टाइल्स तुटल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी लावून धरली आहे. सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत होती. परंतु पादचारी पूल तसेच रेल्वे पूल आदी ठिकाणी सरकते जिने बसवयाची मागणी होत आहे. या पुलाचा वापर अनेक व्यावसायिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून केला जातो. त्यामुळे या पुलावर सरकते जिने बसवले जावेत, यासाठीच्या कामांचा यामध्ये समावेश झालेला दिसत नसल्याने रहिवासी तसेच प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पुलांची दुरुस्ती

सीएसएमटी स्थानकाजवळील सबवे

मेट्रो भुयारी मार्ग

वाय. एम. पूल

केनेडी पूल

सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पूल

ग्रँट रोड येथील रस्ता पूल

ग्रँट रोड येथील स्पेंटा पूल

भायखळा एस. पूल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in