मेट्रो ३ च्या गाडीची यशस्वीपणे जोडणी

सतत ५० किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकणारे शन्टर ठाणे येथील मे. रेनमॅक इंडिया प्रा.लि. यांनी नेदरलँड्सच्या एनआयटीइक्यू संस्थेसोबतच्या संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करारांतर्गत तयार
मेट्रो ३ च्या गाडीची यशस्वीपणे जोडणी

मेट्रो ३ प्रकल्पातील पहिली मेट्रो गाडी अलीकडेच मुंबईत दाखल झाली आहे. आंध्रप्रदेश येथून दोन टप्प्यात आणलेले गाडीचे आठ डबे मुंबईत आणण्यात आल्यानंतर त्याच्या जोडणीचे काम मंगळवार ९ ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात आले. एमएमआरसीने शन्टरची मदत घेत या डब्यांची जोडणी पूर्ण केली आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३ साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन मंगळवार ९ ऑगस्ट रोजी बॅटरी-चलित शन्टरने यशस्वीपणे जोडण्यात आली आहे. सारिपूत नगर येथील तात्पुरत्या कारशेडमधील रूळावर गाडीची जोडणी करण्यात आली आहे. ३५० टन वजन खेचण्याची क्षमता या बॅटरी-चलित शन्टरची असून ८ डब्यांची ट्रेन ९ कि.मी.पर्यंत खेचू शकते. अशा या बॅटरी-चलित शन्टरच्या मदतीने गाडीची जोडणी करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

५० किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकणारे शन्टर

सतत ५० किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकणारे शन्टर ठाणे येथील मे. रेनमॅक इंडिया प्रा.लि. यांनी नेदरलँड्सच्या एनआयटीइक्यू संस्थेसोबतच्या संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करारांतर्गत तयार करून घेण्यात आले आहे. या शन्टरची स्वयंचलित कप्लर तसेच अर्धस्थायी कप्लर अडॉप्टरसह यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली आहे. दोन्ही कप्लर मेट्रो डबे जोडण्यासाठी वापरले जात असून या शन्टरने नुकतीच यशस्वीपणे गाडीची जोडणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in