नऊ वर्षाच्या मुलीवर ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

लहान मुलीवर जोखीम घेऊन ह्रदय प्रत्यारोपण यशस्वी करण्याची किमया मसिना हार्ट इन्स्टिट्यूटने केली
नऊ वर्षाच्या मुलीवर ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

वयाच्या नवव्या वर्षी तिला ह्रदयाचा विकार जडला. त्यावर इलाज केवळ ह्रदयाचे प्रत्यारोपण होते. लहान मुलीवर जोखीम घेऊन ह्रदय प्रत्यारोपण यशस्वी करण्याची किमया मसिना हार्ट इन्स्टिट्यूटने केली आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, वर्षभरापासून या मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जात होत्या. तिचे ह्रदय काम करत नसल्याचे आढळले. तिला कोविडही झाला होता. त्याचा मोठा परिणाम जाणवू लागला. तिच्या आजाराला इंग्रजीत ‘डायलेटेड कार्डियोमायपॅथी’ असे म्हणतात. या आजारात ह्रदयाच्या धमन्या पातळ होतात. त्यामुळे ह्रदयाला रक्ताभिसरण करताना कठीण जाते. त्यामुळे या मुलीला ह्रदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तिने ‘राष्ट्रीय अवयव सुची’त नाव दाखल केले. त्यानंतर तिला सहा महिन्यांनी योग्य ‘डोनर’ मिळाला. हा रुग्ण वडोदऱ्याचा होता.

सल्लागार सर्जन डॉ. झैलाबेदिन हमदुले म्हणाल्या की, २५ मे रोजी या मुलीवर ५ तास शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिला आयसीयूत ठेवण्यात आले. ही मुलगी आता पूर्ववत झाली आहे. तिचा व्हेंटिलेटर काढला आहे. मसिना ह्रदय रुग्णालयातून तिला घरी पाठवण्यात आले आहे. ह्रदय प्रत्यारोपण केल्यानंतर अनेक लहान मुले चांगले, आरोग्यदायी जीवन जगत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in