मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी नागरिक, तज्ज्ञांकडून मागवल्या सूचना; १५ दिवसांत अहवाल सादर करणार

मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी नागरिक, तज्ज्ञांकडून मागवल्या सूचना; १५ दिवसांत अहवाल सादर करणार

१५ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Published on

मुंबई : मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्यासाठी मुंबईकरांकडून हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. नागरिक व तज्ज्ञांनी त्यांच्या सूचना ई-मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जलाशयाची पुनर्बांधणी करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली असून, पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ब्रिटीशकालीन असलेले मलबार हिल जलाशय तब्बल १३६ वर्ष जुने आहे. सध्याच्या फिरोजशाह मेहता उद्यानाच्या (हँगिंग गार्डन) खाली सन १८८७ मध्ये बांधलेल्या या जलाशयामार्फत कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड, ग्रँट रोडमधील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. दक्षिण मुंबईची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन या जलाशयाची पुनर्बांधणी प्रस्तावित असून त्यासाठी ६९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुनर्बांधणीनंतर सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे.

logo
marathi.freepressjournal.in