एसटी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

एसटी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

बीडमधील राज्य परिवहन आगाराच्या बसमध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसमध्येच गळफास घेऊन ६० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. बसमधील लोखंडी दांड्याला दोरी बांधून या व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीचे नाव निवृत्ती आबुज असे आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती कर्मचारी नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.