
मुंबई : प्रतिक्षा नगर येथे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मुलाचे वडील बीएमसीत अधिकारी असून मुलाच्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर त्याचा रक्तदाब वाढला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता हा मुलगा घराच्या बाल्कनीत आला. तेथून त्याने खाली उडी मारली. वडाळा पोलिसांनी त्याला तात्काळ सायन रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित केले. मुलाच्या आत्महत्येची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली नाही. मृत विद्यार्थी १२ वीत होता.