दीड हजार कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान; मालमत्ता कर भरण्याची आज शेवटची मुदत

मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी मागील काही दिवसांपासून कंबर कसली आहे. २०२३ -२४ या आर्थिक वर्षासाठी साडेचार हजार कोटी रुपये कर वसुलीचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.
दीड हजार कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान; मालमत्ता कर भरण्याची आज शेवटची मुदत
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने जास्तीच जास्त मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. २०२३ - २४ या वर्षासाठी शनिवार, ३० मार्चपर्यंत पालिकेने २ हजार ९२० रुपये इतका मालमत्ता कर वसूल केला आहे. रविवार, ३१ मार्च ही शेवटची मुदत असून, उर्वरित दीड हजार कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.

मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी मागील काही दिवसांपासून कंबर कसली आहे. २०२३ -२४ या आर्थिक वर्षासाठी साडेचार हजार कोटी रुपये कर वसुलीचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत रविवार, ३१ मार्चपर्यंत कर भरण्याची शेवटची मुदत आहे. मात्र फेब्रुवारीत देयके पाठवल्याने २५ मे पर्यंत कर भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. एकूण साडेचार हजार रुपये कोटी कर वसुलीचे लक्ष्य असणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जास्तीत जास्त कर वसुलीसाठी महापालिकेने मोठ्या मालमत्ता धारकांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. कर न भरणाऱ्या मालमत्ता कर धारकांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. बुधवार, २७ मार्च २०२४ पर्यंत २ हजार २१३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर संकलित झाला, तर शनिवारी, ३० मार्चपर्यंत २ हजार ९२० कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे. मालमत्ता करधारकांना चालू आर्थिक वर्षानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत मालमत्ता कर भरणा करण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पालिकेसमोर आव्हान असणार आहे.

जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यामुळे पालिकेकडून जास्तीत जास्त कर वसुली करण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे. यासाठी मोठ्या मालमत्ताधारकांकडे पालिकेने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टाइतका मालमत्ता कर संकलनाकामी विविध प्रकारे प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आहेत.

२४ विभाग कार्यालयात नागरिकांचा ओघ वाढला

मालमत्ता कराची सुधारित देयके मालमत्ताधारकांना पाठविताच कर भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्‍या २४ विभाग कार्यालयात नागरिकांचा ओघ वाढला आहे. विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून वेगाने केले जाणारे कामकाज व पुरविल्या जाणाऱ्या विविध सुविधा यामुळे कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

३० मार्चपर्यंत २ हजार ९२० कोटी रुपयांची वसुली

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवल्यानंतर दिलेल्या कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन केले जाते आहे. आतापर्यंत म्हणजे शनिवार, ३० मार्चपर्यंत २ हजार ९२० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. रविवारी शेवटच्या दिवसांपर्यंत जास्तीच जास्त कर वसुलीसाठी पालिकेचा प्रयत्न असणार आहे. करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी देखील प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in