मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक; हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान ब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल.
मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक; हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान ब्लॉक
Published on

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील. तर ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर शनिवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटे ते पहाटे ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत आणि पाचव्या मार्गावर रात्री १२ वाजून ३० मिनिटे ते पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक नसेल.

logo
marathi.freepressjournal.in