मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या, पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी १०.४८ ते दुपारी ३.१८ पर्यंत सीएसएमटी मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक दरम्यान या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहारला डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.१९ ते दुपारी ३.१९ पर्यंत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नाही

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात आलेला नाही. २८ डिसेंबरच्या मध्यरात्री लोअर परेल स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनेल सुरू करण्यासाठी एक प्रमुख नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर ५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल रद्द राहतील. त्यामुळे, रविवारी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक नसेल.

logo
marathi.freepressjournal.in