आरे मेट्रो कार शेड प्रकल्पाला पाठिंबा द्या,गोपाळ शेट्टी यांची पर्यावरणवाद्यांना आवाहन

उपनगरात आम्ही हजारो वृक्ष लागवड केलेली आहे. आरे वसाहतीत अजूनगी वृक्षारोपण होवू शकते.
आरे मेट्रो कार शेड प्रकल्पाला पाठिंबा द्या,गोपाळ शेट्टी यांची पर्यावरणवाद्यांना आवाहन

गोरेगाव येथील आरे कॉलनीत मेट्रो कार शेड पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्व पर्यावरण प्रेमींनी, या महत्वाकांक्षी आणि विकासाला गती देणाऱ्या प्रकल्पाला विरोध करण्याचा हट्ट सोडावा.

हा प्रकल्प महाराष्ट्र हिताचा असून जवळजवळ २५% काम झालेला प्रकल्प इतर ठिकाणी सुरू करायचा झाल्यास खूप आर्थिक नुकसान होईल आणि प्रकल्प अधिक काळासाठी प्रलंबित होऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पर्यावरणवाद्यांना आरे कॉलनीत जाऊन केले.

“उपनगरात आम्ही हजारो वृक्ष लागवड केलेली आहे. आरे वसाहतीत अजूनगी वृक्षारोपण होवू शकते. मेट्रो नियमित सुरू झाल्यास कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होईल. त्यानंतरही जर पर्यावरणप्रेमी समजायला तयार नसतील, तर सर्व विकासप्रेमी नागरिकांना सोबत घेवून आपल्याला शक्ती प्रदर्शन करावे लागेल,” असा इशारा गोपाळ शेट्टी यांनी दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in