आज मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरून आपली बाजू मांडत आहेत. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण हायकोर्ट टिकले होते.
आज मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Published on

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असताना आज सुप्रीम कोर्टात आरक्षाणावर महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं होत. आज याच याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होईल. या सुनावणीबद्दल मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले आहेत की, मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळणार आहे. सर्वोच न्यायालयामध्ये जे आरक्षण टिकेल त्या आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला आज टिकणार आरक्षण मिळेल असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरून आपली बाजू मांडत आहेत. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण हायकोर्ट टिकले होते. पण त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी नव्याने राज्यभरात पेटला होता. त्यात मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे हे देखील आमरण उपोषणाला बसले होते. त्यामुळे या मुद्दा आणखी ऐरणीवर आला होता.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केले होते. १३ ऑक्टोम्बरला दाखल केलेल्या पिटिशन वर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागून आहे. उदयापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे त्यामुळे आजच्या निकालांत काय घडणार आहे हे पाहणे फार गरजेजचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in