अन्ननलिका फुटलेल्या न्यूझीलंडच्या महिलेवर शस्त्रक्रिया

तब्बल ७ महिन्यांनी तिने तोंडावाटे केले अन्नाचे सेवन
अन्ननलिका फुटलेल्या न्यूझीलंडच्या महिलेवर शस्त्रक्रिया

मुंबई : रुग्णाची अन्ननलिका फुटल्याने न्यूझीलंडमधील ६० वर्षीय महिलेला ७ महिन्यापासून फीडिंग ट्यूबद्वारे अन्नाचे सेवन करायला लागत होते. चुकीच्या होणाऱ्या निदानामुळे हा त्रास वाढत चालला होता. बोअरहॅव्ह सिंड्रोम (अन्ननलिका फुटणे) सारख्या दुर्मिळ आजाराचे निदान झाले. पोट विकारतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता ही महिला तोंडावाटे अन्नाचे सेवन करू लागली आहे.

न्यूझीलंडमधील प्रिया कपूर (नाव बदलले आहे) यांना ७ महिन्यांपूर्वी उलट्या होणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे आढळून आली. तिने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला ज्यांनी सुरुवातीला तिला उजव्या एम्पायमा थोरॅक्स (फुफ्फुस आणि छातीच्या भिंतीमधील फुफ्फुसाच्या जागेत पू जमा होणे) असल्याचे चुकीचे निदान झाले. तेथील स्थानिक रूग्णालयात पुन्हा फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये, तिच्यावर छातीच्या उडव्या बाजूला दोन शस्त्रक्रिया झाल्या, ज्यात फुफ्फुस किंवा छातीच्या पोकळीतील इतर अवयवांमध्ये छिद्र पाडून प्रवेश करण्यात आला. या प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेवर परिणाम झाला.

रुग्णालयात आल्यावर एन्डोस्कोपीमध्ये अन्ननलिकेमध्ये ५ सेमी छिद्र (छिद्र) आढळून आले. शिवाय, तिला डाव्या बाजूचा व्होकल कॉर्ड पाल्सीचे निदान झाले. सीटी स्कॅनने या निदानाची खात्री केली. त्यानंतर दिवस ठरवून या महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला एक दिवस आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर ५ व्या दिवशी रुग्ण नळीवाटे अन्न ग्रहण करू लागली. १० दिवसांच्या आत हळूहळू समतोल आहार घेऊ लागली आहे. या उपचारानंतर, रुग्ण कोणत्याही नळीवाटे न खाता तोंडाने अन्नाचे सेवन करत आहे, असेही डॉ. रॉय पाटणकर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in