सहा दिवसांत १९ लाख ६६ हजार घरांचे सर्वेक्षण; दोन लाखांहून अधिक घरांचा सर्वेक्षणाला नकार

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून मुंबईत सुरुवात झाली आहे.
सहा दिवसांत १९ लाख ६६ हजार घरांचे सर्वेक्षण;
दोन लाखांहून अधिक घरांचा सर्वेक्षणाला नकार
Published on

मुंबई : मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सहा दिवसांच्या सर्वेक्षणात १९ लाख ६६ हजार ९२६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. २३ ते २८ जानेवारी या सहा दिवसांत २ लाख ६९ हजार ४९५ घरांनी सर्वेक्षणाला नकार दिला असून ५ लाख ७० हजार ९८४ घरांना टाळे होते, अशी पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. ३१ जानेवारीपर्यंत ३९ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांतील ३० हजार कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. २३ जानेवारी पहिल्या दिवशी २ लाख ६५ हजार १२० घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले, तर २८ जानेवारीला सहाव्या दिवशी ३ लाख ८८ हजार ७०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

असे होतेय घरांचे सर्वेक्षण

२३ ते २८ जानेवारी

दरम्यान सर्वेक्षण

२३ जानेवारी- २,६५,१२०

२४ जानेवारी - ५,३९,४८८

२५ जानेवारी - ६,७३,८८३

२६ जानेवारी - ४,५४,९२३

२७ जानेवारी - ४,८५,४०२

२८ जानेवारी - ३,८८,७०२

सर्वेक्षणाला नकार

२३ जानेवारी - ३१,०६९

२४ जानेवारी - ४६,४२७

२५ जानेवारी - ५९,२६७

२६ जानेवारी - ४७,१७४

२७ जानेवारी - ४९,५९४

२८ जानेवारी - ३६,०५४

logo
marathi.freepressjournal.in